‘कृष्णा’चे मोहन कदम राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम
कराड/प्रतिनिधी : –
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी श्री. मोहन दिनकर कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे येथील पारितोषिक वितरण समारंभात राष्ट्रीय कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे चेअरमन व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या हस्ते श्री. कदम यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, संघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहोळ व व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, लेखक अच्युत गोडबोले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाने सहकारी साखर कारखान्याकरिता प्रश्नमंजुषा, घोषवाक्य, पोस्टर व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ४४९ लोकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
पुणे येथील सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हसिटी ऑडीटोरियम,किवळे, पिंपरी चिंचवड येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. श्री.कदम यांना प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मोहन कदम यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



