आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्या

कराड नगरपरिषदत अध्यक्षपदासाठी ९ जण तर नगरसेवकसाठी १०९ उमेदवार रिंगणात

 

 

 

कराड / प्रतिनिधी : –

कराड नगरपरिषद निवडणुकीत यंदा मोठा राजकीय गलका रंगात आला आहे. अध्यक्षपदासाठी पक्षीय तसेच अपक्ष अशा एकूण ९ उमेदवारांनी रिंगणात प्रवेश केला असून नगरसेवक पदासाठी तब्बल १०९ उमेदवारांनी अर्ज दाखल करत चुरशीची निवडणूक स्पष्ट केली आहे.

अध्यक्षपदासाठी भाजपकडून विनायक पावसकर, काँग्रेसचे झाकीर पठाण, बसपाचे इमरान मुल्ला, यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव तर अपक्ष म्हणून गणेश कापसे, श्रीकांत घोडके, शरद देव, रणजीत पाटील आणि बापू लांडगे मैदानात आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची लढत बहुकोनी होणार असून मतदार कोणाकडे झुकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नगरसेवक पदासाठी १५ प्रभागांमधून रिंगणात राहिलेले उमेदवार :

प्रभाग १ अ – सुरेखा काटकर, रूपाली माने.

प्रभाग १ ब – संजय कांबळे, जयवंत पाटील, हूमेरा शेख.

प्रभाग २ अ – नीलम कदम, पद्मजा लाड, भाग्यश्री साळुंखे.

प्रभाग २ ब – समीर करमरकर, सुहास पवार.

प्रभाग ३ अ – रजिया आंबेकरी, कश्मिरा इंगवले, सारिका देशमुख, निकहत नदाफ, रजनी पवार.

प्रभाग ३ ब – प्रवीण पवार, संकेत पवार, रियाज मुजावर, सागर लादे, जावेद शेख, साहेबराव शेवाळे, दाऊद सय्यद.

प्रभाग ४ अ – शैला पाटील, स्वाती मोहिते, प्रियांका यादव.

प्रभाग ४ ब – अर्चना ढेकळे, शिवाजी रामूगडे, आनंद लादे.

प्रभाग ५ अ – अर्चना पाटील, अरुणा पाटील, रेवती बर्गे, मिनाज सुतार.

प्रभाग ५ ब – राजेंद्र कांबळे, राहुल भोसले, योगेश लादे, शुभम लादे.

प्रभाग ६ अ – वहिदा इनामदार, शारदा माने, सानिया मुतवल्ली, साजिदा मुल्ला.

प्रभाग ६ ब – राहील मुतवल्ली, सुनील व्हावळ, अल्ताफ शिकलगार.

प्रभाग ७ अ – प्रिया आलेकरी, अंजली कुंभार, वंदना गायकवाड, तेजश्री पाटसकर.

प्रभाग ७ ब – अजय कुलकर्णी, मन्सूर खैरतखान, अजय पावसकर, जयराज बेडेकर, विनायक मोहिते, विद्या मोरे.

प्रभाग ८ अ – देवयानी डुबल, किशोरी शिंदे, सुनीता साळुंखे.

प्रभाग ८ ब – संजय चन्ने, विजय वाटेगावकर.

प्रभाग ९ अ – मिनाज पटवेकर, शमीम बागवान.

प्रभाग ९ ब – आशुतोष जाधव, समीर पटवेकर, प्रताप साळुंखे.

प्रभाग १० अ – आशा मुळे, मनीषा मुळे.

प्रभाग १० ब – प्रताप इंगवले, मोहसीन कागदी, नागेश कुरले, सुमित जाधव, यशराज सुर्वे.

प्रभाग ११ अ – सुदर्शना थोरवडे, माया भोसले, शुभांगी भोसले, वैष्णवी वायदंडे.

प्रभाग ११ ब – पुनम धोतरे, गणेश पवार, अजित भोसले, योगेश वेल्हाळ, अक्षय सुर्वे.

प्रभाग १२ अ – तेजस्विनी कुंभार, स्मिता धोत्रे, अनिता पवार, रुकैया मुलानी.

प्रभाग १२ ब – गणेश कापसे, वीरेंद्र गुजर, श्रीकांत घोडके, विजय यादव, शाहरुख शिकलगार, जय सूर्यवंशी.

प्रभाग १३ अ – कीर्तीका गाढवे, स्मिता हुलवान.

प्रभाग १३ ब – आशुतोष डूबल, सिद्धांत पाटील, अमरजीत राजापुरे, राकेश शाह.

प्रभाग १४ अ – प्रियांका भोंगाळे, वर्षा वास्के.

प्रभाग १४ ब – शिवाजी पवार, इंद्रजीत भोपते, किरण सूर्यवंशी.

प्रभाग १५ अ – दया गायकवाड, पुनम घेवदे, योगिता जगताप.

प्रभाग १५ ब – अख्तरहुसेन आंबेकरी, नईम पठाण, विश्वनाथ फुटाणे.

प्रभाग १५ क – सुप्रिया खराडे, हसीना मुल्ला, संगीता शिंदे.

यंदाच्या निवडणुकीत महिलांची भक्कम नोंद, तरुणांचे प्रमाण आणि अपक्षांची मोठी उपस्थिती यामुळे कराडमध्ये अनेक ठिकाणी तिरंगी व चौफेरी लढती होत आहेत. पक्षीय समीकरणांबरोबरच स्थानिक आघाड्या आणि वैयक्तिक लोकप्रियतेची सरशी कुणाची ठरणार, याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक तापत असून रिंगण अंतिम झाल्यामुळे शहरात राजकीय वातावरण अधिकच रंग चढू लागले आहे.

Related Articles