आयुष्यमान स्पेशल
प्रभाग क्रमांक ५ मधून सौ.स्नेहल कदम यांचा अर्ज दाखल

कराड / प्रतिनिधी :-
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ.स्नेहल मोहन कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षातून व यशवंत विकास आघाडीतून उमेदवारी कडून दाखल केला आहे.
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.



