सातारा जिल्हाहोम
‘कृष्णा’ व ‘जयवंत शुगर्स’कडून ३५०० रुपये ऊस दर जाहीर

कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने सन २०२५-२६ या हंगामात गळीतास येणार्या ऊसाला प्रतिटन ३५०० रूपये दर जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्स या दोन्ही कारखान्यांनी नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत, चांगला दर देण्याचे धोरण अवलंबले आहे. यंदाच्या हंगामासाठी दोन्ही कारखान्यांनी ३५०० रूपये ऊस दर जाहीर केल्याने, शेतकरी सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.



