सातारा जिल्हाहोम

आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

साधू-संत येई घरा तोचि दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे, येथील माजी आमदार आनंदराव (नाना) पाटील यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. शुक्रवार, दि. २४ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला सातारा जिल्हा व कराड तालुक्यातील असंख्य मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी सनदी अधिकारी श्रीनिवास जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील, माजी नगराध्यक्ष माधवराव पवार, जयवंतराव पाटील, पै. जगन्नाथ मोहिते, सातारा भाजपा उपाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, डॉ. बलराज पाटील, सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, निवासराव थोरात, माजी नगरसेवक अतुल शिंदे, विजय वाटेगावकर, सुहास जगताप, बंडा काका डुबल, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांनी सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी, हा स्नेहमेळावा हा केवळ फराळाचा नव्हे, तर सामाजिक एकतेचा आणि स्नेहबंध वृद्धिंगत करण्याचा सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन व स्वागत विजयनगरचे उपसरपंच मानसिंगराव पाटील, युवा नेते प्रतापसिंह पाटील, दिलीपराव पाटील यांनी केले. कार्यक्रमास कराड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

Related Articles