सातारा जिल्हाहोम

येणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार – नामदेवराव पाटील 

कराड/प्रतिनिधी : –

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून, कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता एकजुटीने कामाला लागावे, अशा सूचना देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनतेच्या सहकार्याने निश्चितच विजय मिळवेल, असा विश्वास कराड दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केला.

दिवाळीनिमित्त आयोजित फराळ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील-चिखलीकर, युवानेते इंद्रजीत चव्हाण, महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, गजानन आवळकर, सचिव प्रदीप जाधव, उपाध्यक्ष नानासो जाधव, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ॲड. अमित जाधव, माजी नगरसेवक अशोकराव पाटील, शिवाजी जमाले, रवि बडेकर, सुरेश भोसले, प्रदीप शिर्के यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अध्यक्ष पाटील म्हणाले, काँग्रेस हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून, कराड दक्षिण मतदारसंघाला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या काळात कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे झाली, यातून कराडचा चेहरामोहराच बदलला. आजही अनेक विकासकामांची भूमिपूजनं व उद्घाटनं सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी इंद्रजीत चव्हाण, ॲड. अमित जाधव, अजितराव पाटील-चिखलीकर, वैशाली जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, दिग्विजय सूर्यवंशी आदींनीही मनोमते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय माने यांनी केले.

Related Articles