सातारा जिल्हाहोम

अन्नपूर्णा महिला उत्पादन गट’च्या स्टॉलचे गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत वसुंधरा महिला प्रभाग संघ, काले यांच्यावतीने संचलित अन्नपूर्णा महिला उत्पादक गट, वाठार यांच्या श्री लक्ष्मीपूजन पूजा साहित्याच्या स्टॉलचे उद्घाटन पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील व प्रभाग समन्वयक करण जाधव (काले जिल्हा परिषद गट) यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महिला बचत गटाच्या दिपाली पाटील (वाठार) व प्रियांका पाटील (सीआरपी, वाठार) या उपस्थित होत्या. या उपक्रमाअंतर्गत विविध पूजासाहित्याचे स्टॉल १३ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पंचायत समिती, कराड येथे माफक दरात उपलब्ध राहणार आहेत. सर्व नागरिकांनी या महिला बचत गटाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी केले आहे.

Related Articles