सातारा जिल्हाहोम

कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड

कराड/प्रतिनिधी : –

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत रयत पॅनेलचे उमेदवार, रिसवड, ता. कराड गावाचे सुपुत्र पै. शंकरराव (सतीश) दिनकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेलच्या एकमताने पार पडली.

सदर निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव (उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड), तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडले.

याप्रसंगी उपसभापती संभाजी श्रीरंग काकडे, तसेच संचालक दिपक (प्रकाश) पाटील, संभाजी चव्हाण, विजयकुमार कदम, दयानंद पाटील, विनोद (सोमनाथ) जाधव, उध्दवराव फाळके, मानसिंगराव जगदाळे, सर्जेराव गुरव, राजेंद्र चव्हाण, नितीन ढापरे, जयंतीलाल (मनुभाई) पटेल, जगन्नाथ लावंड, गणपत पाटील, संचालक श्रीमती इंदिरा जाधव-पाटील आणि प्रभारी सचिव आबासो पाटील उपस्थित होते.

Related Articles