सातारा जिल्हाहोम

सह्याद्रि कारखान्याचा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ

कराड/प्रतिनिधी : –

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 या 52 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमीच्या मंगलदिनी गुरुवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाचे उद्घाटन कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील व त्यांच्या सौ. संध्यारजनी पाटील यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन व माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील असतील. यावेळी कारखान्याचे सर्व संचालकही प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सन 2025-26 हंगामात नोंदविलेल्या ऊसाचे गळीत पूर्ण करण्यासाठी तोडणी व वाहतूक यंत्रणेची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी बैलगाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक आदी वाहनांचे करार करण्यात आले असून, कारखान्याची मशिनरी दुरुस्ती व ओव्हरहॉलिंगची कामेही पूर्णत्वास आली आहेत.

या समारंभासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी-वाहतूक कंत्राटदार आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी केले आहे.

Related Articles