सातारा जिल्हाहोम

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना आमदार अतुल भोसले यांच्या पुढाकारातून जीवनावश्यक वस्तूचे किट रवाना

कराड/प्रतिनिधी : –

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात कृष्णा समूहाच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे किट घेऊन जाणारी वाहने नुकतीच कराडमधून रवाना करण्यात आली.

 

मराठवाडा परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे जलमय झाली आहे. या भागातील शेतजमिनींचे प्रचंड नुकसान झाले असून, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. अशा संकटकाळात सामाजिक जाणीवेतून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कृष्णा समूहाने जीवनावश्यक अन्नधान्य व अन्य वस्तूंचे किट तयार केले आहे. हे मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांचे पूजन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्या हस्ते करून, ही वाहने बीड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली.

याप्रसंगी भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, कृष्णा बँकेचे संचालक प्रमोद पाटील, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, मलकापूरचे माजी नगरसेवक हणमंतराव जाधव, सूरज शेवाळे, सूर्यकांत खिलारे, बाळासाहेब घाडगे, राजू मुल्ला, तानाजी देशमुख, शहाजी पाटील, प्रशांत चांदे, धनाजी माने, संतोष हिंगसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles