सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याची शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभा

कराड/प्रतिनिधी : –
येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अधिमंडळाची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कारखाना कार्यस्थळावर प्राथमिक मराठी शाळेेच्या समोरील प्रांगणात होणार आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे, अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी दिली.
सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसेच गेल्या हंगामातील प्रगतीचा आढावा मांडला जाणार आहे. सभेला कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सभेस येताना सभासदांनी प्रवेशपत्रिका, ओळखपत्र / स्मार्टकार्ड आणणे आवश्यक आहे. तरी सर्व सभासदांनी सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी केले आहे.

Related Articles