सातारा जिल्हाहोम

दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात

कराड/प्रतिनिधी : –

मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित, दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२३-२५ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ सोमवार, दि. १५ रोजी उत्साहात पार पडला.

समारंभाची सुरुवात फोटोपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरण विभाग कराड शहरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रल्हाद बुचडे व जगदंबा इंडस्ट्रिजचे अश्विन बानुगडे यांच्या हस्ते इलेक्ट्रिशियन ट्रेड – महेश खंडागळे, ईशा शिंदे, रोहन कांबळे, फिटर ट्रेड – आकाश घाडगे, केदार पवार, सार्थक जाधव, ड्रा. सिव्हिल – रोहन जाधव, आदित्य कदम, ड्रा. मेकॅनिकल – सानिका सुर्वे, सायली भिसे, दिक्षा ननवरे यांच्यासह विविध ट्रेडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी व मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातून व्यावहारिक जगात प्रवेश करताना जबाबदारी, प्रामाणिकपणा व कौशल्य यांचा संगम साधण्याचे, तसेच विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक होऊन समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही केले.

यावेळी संस्थेचे सचिव अभिजीत मोकाशी, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक विलास चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ. एस.एम. पवार यांनी विद्यार्थ्यांकडून आगामी काळात अधिक उंची गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles