पळशीत प्रभाकर घार्गे वाढदिवसानिमित्त गुरुवारी शेतकरी मेळावा

वडूज /प्रतिनिधी :-
सातारा-सांगली विधान परिषदेचे माजी आमदार पडळ येथील खटाव-माण अॅग्रो साखर कारखान्याचे संस्थापक प्रभाकर घार्गे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व खटाव-माण साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पळशी येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान (ए.आय.) कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांच्याहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी खटाव माण साखर कारखान्याचे को. चेअरमन आ. मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी व्ही. आय. पुणेचे पिक उत्पादन व संरक्षण विभागातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग व बारामती येथील के. व्ही. के. चे मुद्रा शास्त्रज्ञ तथा कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञ डॉ. विवेक भोईटे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यास खटाव-माण तालुक्यातील शेतकरी तसेच हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी घनश्याम सावंत, के. एम. शुगरचे मुख्य शेती अधिकारी किरण पवार व संयोजकांनी केले आहे.