आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

प्रभाकर घार्गेच्या वाढदिवसा निमित्त A I तंत्रज्ञानाची पर्वणी

 

वडूज/प्रतिनिधी :-

 

जिल्हा बँकेचे वडूज विभागीय कार्यालय व खटाव-माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार, दि. १८ रोजी पळशी, ता. खटाव येथे दुपारी दोन वाजता शेतकऱ्यांसाठी ए आय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतीचे धडे दिले जाणार आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष खा. नितीन पाटील, प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते या मेळाच्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी आ. मनोजदादा घोरपडे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या मेळाव्यात तज्ज्ञ शेतकऱ्यांना ऊस व इतर पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो याचे मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः पाणी व खत व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, उत्पादन अंदाज व बाजारभावाचे भाकीत करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्ट करण्यात येणार आहेत.

Related Articles