सातारा जिल्हाहोम

आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे बुधवारी वितरण

कराड/प्रतिनिधी : –

येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान समारंभ स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या स्मृतिदिनी बुधवार, दि. १७ रोजी दुपारी 12.30 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, टाऊन हॉल, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे.

सन २०२५ चा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती, भारत फोर्ज पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना, ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्याहस्ते व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी ९.३० वाजता आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांच्या, श्री शिवाजी हायस्कूल, कराड येथील समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कराड आणि परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. गुजर व सर्व विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles