सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याचा ३३११ रुपयांचा अंतिम ऊस दर – डॉ. सुरेश भोसले

जिल्ह्यात उच्चांकी दर; १११ रुपयांचे अंतिम बिल लवकरच वर्ग 

कराड/प्रतिनिधी : –

येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी उच्चांकी ऊसदराची परंपरा जपत, सन २०२४-२५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या ऊसासाठी ३३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्याचा हा दर जिल्ह्यातील सर्वाधिक दर ठरला असून, विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कृष्णा कारखान्याने सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात १२,३९,००८ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला आहे. तसेच १४,५१,१५७ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने उच्चांकी ऊस दराची परंपरा जोपासत गेल्या गळीत हंगामासाठी ३३११ रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. कृष्णा कारखान्यास २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात ऊस घातलेल्या सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना यापूर्वी ३२०० रुपयांप्रमाणे बिल अदा करण्यात आले आहे. तर आता विनाकपात १११ रुपयांचा अंतिम हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जाणार आहे, असे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles