सातारा जिल्हाहोम

कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –

विजय दिवस समारोह समितीच्या वतीने “कारगिल विजय दिवस” (शौर्य दिन) कराडमध्ये साजरा करण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांच्या हस्ते विजय स्तंभावर पुष्पचक्र वाहून शहिद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित जवान, युवक व मान्यवरांनी दिलेल्या ‘भारत माता की जय, जय जवान जय किसान, वंदे मातरम् आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

याप्रसंगी वरीष्ठ पोलीस निरीक्षक ताशिलदार यांनी पराक्रम व शौर्याबद्दल भारतीय सैन्य दलांचे अभिनंदन केले. व कराड शहरात विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कारगील विजय दिवस साजरा करुन कराडच्या जनतेत, युवकांमध्ये भारतीय सैनिकांच्या बद्दल अभिमानाची भावना निर्माण केली. विजय दिवस समारोह समितीच्या वतीने असे कार्यक्रम होतायत, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे उद्गार काढले. विजय दिवसच्या विविध उपक्रमांद्वारे भारतीय सैनिकांच्या पराक्रमाची जनतेला माहिती होते. युवकांच्यात शिस्त निर्माण होते, हे अत्यंत महत्त्वाचे व उत्कृष्ट कार्य आहे. आपल्या प्रत्येक उपक्रमात आमचे पोलीस दल आपल्याबरोबर असेल, असे मत व्यक्त केले.

सहसचिव विलासराव जाधव प्रास्ताविकात भारतीय जवानांच्या शौर्याचे व विजयाचे स्मरण करण्यासाठी कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी २६ जुलै “कारगिल विजय दिवस” कराडमधील विजय स्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून मानवंदना देऊन साजरा केला जातो. आजचा २६ वा कारगिल विजय दिवस असल्याचे सांगितले.

याप्रसंगी विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, संचालक वृक्षमित्र चंद्रकांत, जाधव, सलिम मुजावर, सेवानिवृत्त तहसीलदार मोहनराव डोळ, माजी नगरअभियंता ए.आर. पवार, प्रा.बी.एस. खोत, प्राचार्य गणपतराव कणसे, रत्नाकर शानभाग, प्रा. जालिंदर काशीद, प्रा. रजनिश पिसे, राजीव अपिने, पत्रकार हेमंत पवार, शरद गाढे, संतोष पवार, छत्रपती शिवाजी उद्यानचे सर्व सदस्य, सुभेदार प्रशांत कदम आणि त्यांच्या सैनिक ग्रुप फेडरेशनचे पदाधिकारी, जवान युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles