सातारा जिल्हाहोम

स्व. शिवाजीराव देसाई यांचा शनिवारी दौलतनगरला पुण्यतिथी कार्यक्रम

कराड/प्रतिनिधी : –

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा ३९ वा पुण्यतिथी कार्यक्रम शनिवार, दि. १२ रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर, ता. पाटण येथे विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. स्व. शिवाजीराव देसाई यांचे पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या  पुर्णाकृती पुतळयासमोर भजनाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमानंतर सकाळी १० वा. ना. शंभूराज देसाई, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पाचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेतील प्रत्येक केंद्रात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस, प्रशस्तीपत्रक व गौरवचिन्ह देवून या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ना. देसाई यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद, हितचिंतक, पालकवर्ग,विद्यार्थी व कार्यकर्ते या सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी केले आहे.

Related Articles