बीव्हीजी कडून वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची आरोग्यसेवा
१२० रुग्णवाहिकेद्वारे, ८६४३ वारकऱ्यांची आरोग्यसेवा

सातारा / प्रतिनिधी : –
पंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. राज्यात भारत विकास गृपद्वारे (बीव्हीजी) १०८ रुग्णवाहिका सेवेची अमंलबजावणी केली जाते. आजतागायत ८६४३ वारकऱ्यांनी आरोग्यसेवाचा लाभ घेतला आहे.
वारकरी बांधवांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेने पंढरपुर येथे नियंत्रण कक्ष तयार केला आहे. नियंत्रण कक्षाद्वारे पालखी सोहळ्याचे बारकाईने निरिक्षण करुन तत्काळ आरोग्यसेवा देण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत आहेत. पायी वारी करताना भाविकांना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी. अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेला केली होती. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेची अमंलबजावणी करण्यासाठी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी अवघ्या काही तासातच १२० रुग्णवाहिका पालखी सोहळ्यासाठी तैनात केल्या. रुग्णवाहिकेद्वारे १२० डॉक्टर व १२८ ड्रायवर वारकऱ्यांना २४ तास आरोग्यसेवा अर्पण करत आहेत.
‘भारताचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरीच्या वारीत भाविकांना आरोग्य सेवा देण्याची संधी आम्हाला मिळतेय, हे मी माझे भाग्य समजतो. माननीय आरोग्यमंत्री अबिटकर साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार अवघ्या काही तासातच पालखी सोहळ्यासाठी १२० रुग्णवाहिकेचे नियोजन आम्ही केले. वारकऱ्यांना आरोग्यमय वारी अनुभवता यावी, यासाठी २४८ आरोग्यदूत अहोरात्र कार्यरत आहेत. अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी व्यक्त केली.
१०८ रुग्णवाहिकेचे वारीचे नियोजन
मानाच्या १० पालख्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात ९० बेसिक लाईफ सपोर्ट व ३० ॲडव्हांस लाईफ सपोर्ट या प्रकारातल्या रुग्णवाहिका आहेत.
पालखींची नावे खालिल प्रमाणे,
1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
5) संत तुकाराम महाराज ( देहू )
6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
9) संत निळोबाराय( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )