सातारा जिल्हाहोम

महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –

येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीत नवीन प्रवेश घेतलेल्या नवांगतांचे स्वागत बँड पथककाच्या साह्याने व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराडचे संचालक अॅड. सतीश पाटील यांच्या हस्ते पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही नवांगतांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना अॅड. पाटील म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत आपल्या विद्यालयात चांगले  शिक्षण घेऊन गुणवत्ता प्राप्त करावी. शाळेचे आणि संस्थेचे नाव उज्वल करावे. यावेळी  विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस. लादे, श्री. खाडे, सूर्यवंशी सर, माळी सर, सौ. कुलकर्णी मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. शिंदे यांनी, तर आर. के. ठाकरे यांनी आभार मानले.

Related Articles