सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
महाराष्ट्रदिनी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याहस्ते शासकीय ध्वजवंदन
46 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त कराड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय येथे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याहस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार कल्पना ढवळे, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार, नायब तहसीलदार युवराज पाटील, कराड तालुका सहकारी संस्था उपनिबंधक अपर्णा यादव यांच्यासह तहसील, प्रांत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी महाराष्ट्र म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता, सामाजिक समतेचा गड आहे. आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्यासारख्या महामानवांनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि स्वातंत्र्याचा मंत्र दिला. आज या वैभवशाली परंपरेला पुढे नेण्याची, सुशासन, विकास, आणि सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी निष्ठेने कार्य करण्याची आपल्यावर जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, विकासासाठी लोकप्रतिनिधी म्हणून, तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर राहायला हवे. असे सांगून आमदार भोसले यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
46 1 minute read