कृष्णा कारखाना येथे १६ जानेवारीपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
सहकारमहर्षी स्व. जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

कराड तालुका साखर कामगार युनियन व गणेश शिवोत्सव मंडळ व कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजेत्या प्रथम, द्वित्तीय, तृत्तीय, चतृर्थ क्रमांकाच्या संघाला अनुक्रमे ५० हजार १११ रुपये व चषक, ४० हजार १११ रुपये व चषक, ३० हजार १११ रुपये आणि २० हजार १११ रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत. याचबरोबर अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड यासाठी प्रत्येकी २ हजार १११ रुपये व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धा सहकारमहर्षी जयवंतराव भोसले क्रिडानगरी येथे खेळविल्या जाणार असून, संघांनी प्रा. संजय पाटील (मोबा. ९८५०२३९५००), प्रा. अमोल मंडले (मोबा. ८६०५९८४५६७ ), प्रा. महेश कुंभार (मोबा. ९८५०९१९८५०), ज्ञानदेव पाटील (मोबा. ९८२३९४६३४६), राहुल निकम (मोबा. ९९७५७९८५७९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांनी केले आहे.