श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
जखिणवाडी/नांदलापूर ता. कराड येथील श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाले. तसेच सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या दिनदर्शिकेमध्ये सर्व प्रकारची माहिती असून सर्वांसाठी ती उपयुक्त असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कृषी मित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी दिली.
पतसंस्था गेली 38 वर्षे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून शेती व शेतीविकासाठी मोलाचे योगदान आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा असून संस्थेचे मुख्य कार्यालयासह 20 शाखा कार्यरत आहेत. संस्था आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. शालेय विद्यार्थ्यांना व शाळांना शैक्षणिक साहित्य रूपाने मदत, 5 सप्टेंबर शिक्षक दिनी गुरुजनांचा सत्कार समारंभ,आपदग्रस्तांना तातडीची मदत, वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या खेळाडूंना आर्थिक मदत, असे उपक्रम राबवले जातात.
श्री मळाईदेवी नगरी सहकारी पतसंस्थेचा एकूण व्यवसाय कोट्यावधी रुपयात असून ठेवी 151 कोटी असून कर्ज 115 कोटी वाटप करून आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.संस्थेचे लेखा परीक्षक सावंतसो चार्टर्ड अकाउंटंट , कराड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले जाते. तसेच उपनिबंधक सहकारी संस्था, कराडचे श्री संजय जाधवसो व त्यांचे सर्व अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन घेण्यात येते.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले, सहकार खात्याचे सर्व निकष मानांकित पूर्तता प्रत्येक वर्षी संस्था करते.यावर्षी सुद्धा नवीन गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली आहे.याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ,सभासद, ठेवीदार,कर्जदार तसेच सेवकांना जाते. या सहकार्याबद्दल अशोकराव थोरात (भाऊ) यांनी आभार मानले.
संस्थेने 55 कोटी 90 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे.संस्थेचे वसूल भाग भांडवल 11 कोटी 66 लाख व खेळते भांडवल 181 कोटी रुपये इतके आहे.संचालक मंडळाने व्यवसाय व्यवस्थापनाचे वेळप्रसंगी सहकार खात्यातील या धोरणानुसार लवचिकता ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन व मलकापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, व्हा. चेअरमन चंद्रकांत टंकसाळे, माजी चेअरमन अरुणादेवी पाटील, अरुण पवार, वसंत चव्हाण, मारुती रावते, दत्तात्रय लावंड, भीमाशंकर माऊर, अविनाश चंद्रजीत पाटील, नंदकुमार संमुख, अनिल शिर्के, दगडू पवार, मलकापूरचे नगरसेवक राजू मुल्ला, आण्णासो काशीद, तसेच मलकापूर, नांदलापूर, जखिणवाडी मधील ग्रामस्थ व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव शिंदे, शाखाधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.