सातारा जिल्हाहोम

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

6 डिसेंबरपासून कराडला प्रदर्शन, तयारीस वेग

कराड/प्रतिनिधी : –

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरवण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन येत्या 6 ते 10 डिसेंबर रोजी होणार आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे 19 वर्ष असून कृषी व औद्योगिक स्तरावरील नवनवीन तंत्रज्ञान यावेळी पहाता येणार आहे. या प्रदर्शनाच्या तयारीसाठी मंडप उभारणीचा शुभारंभ मंगळवार, दि. 26 रोजी सकाळी लोकनेते विलासराव पाटील रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक राजेंद्र चव्हाण, जगन्नाथ लावंड, संभाजी चव्हाण, विजयकुमार कदम, सतिश इंगवले, नितीन ढापरे, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासो पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी समिर पवार, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय खरात, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी संचालक जगन्नाथ लावंड यांचे हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरविलेले देशातील हे एकमेव प्रदर्शन असून शेतकऱ्यांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी लागणारे ज्ञान यामधून मिळणार आहे. या प्रदर्शनांत कृषी व औद्योगिक स्तरावरील विविध बाबी, तसेच खास आकर्षन पहायला मिळणार आहे. याकामी शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व महसूल विभाग, आत्मा विभाग आदींचे मोठे सहकार्य लाभले आहे.

यावेळी बोलताना अॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती तत्पर आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ही संस्था कार्यरत आहे. प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणांत व्हावे, हा उद्देश यामागे आहे. यावर्षी प्रदर्शनात 350 ते 400 स्टॉल सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनाच्या मंडप व्यवस्थेची माहिती देताना धिरज तिवारी म्हणाले, पिलरलेस डोममध्ये वॉटरफ्रुप मंडप उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 400 स्टॉल्स व स्वतंत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन, तसेच नविन तंत्रज्ञान युक्त स्टॉलचा समावेश असणार आहे. उंची मंडपामुळे मंडपात हवा खेळती राहणार आहे. मंडप व परिसरात सर्व सोई सुविधा असणार असून शेतकरी हित डोळयासमोर ठेवून शेतकरी बांधवांसाठी 100 स्टॉल मोफत देण्यात येणार आहेत.

यावेळी माजी जि. प सदस्य प्रदिप पाटील, प्रा. धनाजी काटकर रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे, हणमंतराव चव्हाण, संपतराव इंगवले बाबुराव धोकटे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहीते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे व संचालक कोयना दुध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. शिवाजीराव जाधव व संचालक कोयना बँकेचे संचालक जयवंत शिबे, अविनाश पाटील, स्वा. से. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, व्हा. चेअरमन सिध्दनाथ घराळ व संचालक वसंत पाटील, बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, माजी उपसभापती अशोकराव पाटील-पोतलेकर, डॉ. सुधिर जगताप, संतोष जगताप, पै. नानासाहेब पाटील, सतिश देसाई, संजय पाटील, जगदीश निकम, संदीप शिंदे, प्रकाश पाटील, हणमंत देसाई, आप्पा घोरपडे, सचिन पाटील, संदीप शिंदे, तसेच डायनॅमीक इव्हेंटचे मॅनेजर धीरज तिवारी यांचे सह शासकीय अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles