आयुष्यमान स्पेशल

ना. शंभूराज देसाई यांचे ५८ व्या वाढदिवस साधेपणाने होणार साजरा

दौलतनगर येथील निवासस्थानी सकाळी १० ते दुपारी ०३ पर्यंत शुभेच्छा स्विकारणार

 

दौलतनगर / प्रतिनिधी : –

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सध्या २६१ पाटण विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याने त्यांचा ५८ वा वाढदिवस हा रविवार दि. १७ नोव्हेंबर, रोजी दौलतनगर ता.पाटण येथे साधेपणाने साजरा करण्याचे नियोजित असून कोणत्याही प्रकारचा जाहिर कार्यक्रम आयोजित केला नसून ना. शंभूराज देसाई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांनी पुष्पगुच्छ, हारतुरे आणू नये असे आवाहन नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles