सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ही लढाई – इंद्रजीत गुजर
253 Less than a minute

कराड/प्रतिनिधी : –
शेतकरी, कष्टकरी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या माध्यमातून ही लढाई उभी केली आहे. या लढाईत शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी आशा इंद्रजीत गुजर यांनी व्यक्त केली.
विंग (ता. कराड) येथून सोमवारी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार इंग्रजीत गुजर (कॅप्टन) यांच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी परिवर्तन महाशक्ती आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
श्री. गुजर म्हणाले, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन बलाढ्य शक्तींविरोधात आमची लढाई आहे. परंतु, जनता व शेतकऱ्यांची ताकद मोठी असून ही जनताच आता कराड दक्षिणमध्ये इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
253 Less than a minute