सवंग लोकप्रियतेसाठी सरकारकडून विविध योजनांची घोषणा – आ. बाळासाहेब पाटील

कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील बेरोजगारी, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी, सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा याकडे सरकारचे लक्ष नसून, निव्वळ सवंग लोकप्रियतेसाठी विविध योजनांची घोषणा सरकारकडून होत आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
खटाव तालुक्यातील लाडेगाव व रेवली येथील कार्यकर्त्याच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्रदादा पवार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण, सुरेश पाटील (बापू) यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, राज्यात सत्ता परिवर्तनाचे वारे असून, महाविकास आघाडीचे लोकाभिमुख सरकार लोकांना अपेक्षित आहे. त्याकरीता आपण सर्वानी आपआपसातील मतभेद विसरून विकासाच्या पाठीशी खंबीरपेणे उभे रहा. असे सांगून, लाडेगाव आणि परिसराशी कारखान्याच्या माध्यमातून असलेला जिव्हाळा, मतदार संघाच्या पुनर्रचनेत अधिक मजबूत झाला, मला मिळालेल्या अधिकारातून उपलब्ध होणारा विकास निधी मी मतदार संघातील जनतेसाठी 100 टक्के विनियोग करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. मंत्रिपदाचा कार्यकाळ अजून राहिला आसता तर लक्षणीय विकासकामे करता आली असती, असे सांगून येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले
प्रास्ताविक कृष्णत पाटील यांनी केले व आभार संतोष कदम यांनी मानले. कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पवार (दादा), सुरेश पाटील (बापू), कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, पांडुरंग चव्हाण (खोडशी), विलास शिंदे, मोहम्मद आवटे, दत्तात्रय रुदृके, सुरेश कदम, उपसरपंच सागर दीक्षित सावळा बाबू यादव, रामचंद्र वाईकर, विष्णू वाईकर, बाळासाहेब यादव, बबन सुतार, माजी सरपंच संतोष कदम, उत्तम यादव (तात्या), कृष्ण पाटील, साईनाथ यादव, दीपक राऊत (फौजी), कुंडलिक घाडगे बाबासो यादव, शिवाजी दबडे, नाथा यादव, अनिल उमापे, बाळासो उमापे, सचिन यादव, हणमंत घाडगे, भीमराव तिडके योगेश यादव जयवंत यादव गणेश यादव यांचेसह लाडेगाव व रेवली येथील ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.