आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रहोम

पलूस – कडेगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षात पक्षप्रवेशाचा ओघ वाढलाय

पलूस / प्रतिनिधी : –

 

निवडणूक काळात पक्षांतराच्या घटना अंगवळणी पडल्या आहेत. कार्यकर्ते विविध कारणांसाठी पक्षप्रवेश करतात. पलूस-विधानसभा मतदारसंघात मात्र आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्याने प्रभावित होऊन प्रवेश होत आहेत. दिवसागणिक पक्षप्रवेश वाढताना दिसत आहेत.

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. मतदारसंघातील मतदार जागृत आहेत. इथं काम करावं लागतं. हे ठाऊक असल्याने आमदार डॉ. विश्वजीत कदम व त्यांचं अख्ख कुटुंब मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीचं फळ कदम कुटुंबाला पर्यायाने काँग्रेसला गेली ४० वर्ष मिळत आहे.

स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी या मतदारसंघाला नवी दिशा दिली. विकासाचे काम केले. त्यांचा भलामोठा वारसा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी समर्थपणे पेलला. सार्वजनिक विकासाबरोबर लोकांच्या वैयक्तिक अडचणीत धावून जाणारा नेता ही ओळख निर्माण केली. कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे लोकं पाहत आहेत. विश्वास ठेवत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेशाची मालिका सुरू आहे.

Related Articles