कृष्णा उद्योग समूहातील कोहिनूर : विनू बाबा
कृष्णा उद्योग समूहातील कोहिनूर : विनू बाबा

- कृष्णा विद्यापीठाचे विश्वस्त जयवंत शुगरचे संचालक विनायक भोसले यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त…..
- उंडाळे / वैभव पाटील
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी ज्यांची ख्याती कृष्णा उद्योग समूहात आहे असे उभरते नेतृत्व आणि प्रशासनातील कर्तुत्ववान कोहिनूर हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते व्यक्तिमत्त्व म्हणजे विनू बाबा भोसले
कृष्णा उद्योग समूहाच्या प्रशासनात कार्यरत असेपर्यंत कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकार महर्षी जयवंतराव भोसले आप्पा यांनी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करून कृष्णा उद्योग समूहाचा कायापालट केला. स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांनी नेहमी कृष्णा उद्योग समूहात नवीन तंत्रज्ञान आणून उद्योगसमूहाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला.
यापूर्वी कृष्णा उद्योग समूह फक्त सहकारी कारखान्याशी संबंधित होता परंतु डॉ. सुरेश भोसले व जयवतराव भोसले यांच्या दूरदृष्टीने
या उद्योगसमूहात साखर उद्योग बरोबर , वैद्यकीय शिक्षण बरोबर शिक्षण क्षेत्रासह ज्ञानाची. अनेक कवाडे खुली झाली या त्यांचे कष्टाला नाविन्यपूर्ण साथ देण्यासाठी तिसरी पिढी पुढे आली व या तिसऱ्या पिढीच्या कार्य कर्तृत्वावर कृष्णा उद्योग. समहूची भरभराट सुरू आहे. भोसले यांच्या तिसऱ्या पिढीत दोन कर्त्वान नेतृत्व पुढे आली .त्यामध्ये राजकारण समाजकारणात डॉ. अतुल भोसले, आणि प्रशासनात विनू बाबा भोसले हे होत. या दोघांनी यांनी उद्योगसमूहात जेव्हा पाऊल ठेवले ठेवले तेव्हा उद्योगसमूहाची पथका जोरात फडकू लागली जवंतराव भोसले यांचे वैचारिक पाठबळ डॉ अतुल भोसले व विनायक भोसले या दोघा बंधूंच्या पाठीशी असल्याने या बंधूद्वयानी याच पाठबळावर डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा उद्योग समूहात शैक्षणिक सहकार, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती केली .
स्वर्गीय जयंतराव भोसले यांनी त्यांच्या कारकिर्दीत लावलेले कृष्णा उद्योग समूहाचे रोपटे आता वटवृक्षात रूपांतरित झाले आहे
यासाठी या कृष्णा उद्योग समूहातील प्रशासनाची जबाबदारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, विनायक भोसले या दोघांनी खांद्यावर घेत ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत विस्तार केला. .”.दिलेल्या शब्दाला जागणारा शब्दाचा पक्का” अशी वेगळी ओळख विनू बाबाची या समूहात आहे.
विनायक भोसले यांच्याकडे आज अत्यंत आदराने पाहिले जाते प्रशासनातील कर्तबगारपणा असल्यामुळे कोणतीही काम करताना समोरच्या व्यक्तीचा गैरसमज होणार नाही याची काळजी घेतात त्यामुळे एखादी काम होणार असेल तरच हो आणि नाही होणार असेल तर नम्रपणे नंतर पाहू अशी भूमिका घेणारे ते आहेत राजकारण आणि समाजकारण करत असताना अतुल भोसले यांना त्यांची फार मोठी साथ लाभते दिवसभरात 12 ते 14 तास प्रशासनातील कामकाजासाठी वेळ देण्याचे महत्त्वपूर्ण काम विनायक बाबा करतात या कामाजा बरोबर मतदार संघातील कार्यकर्ते व सर्वसामान्यांना सुद्धा तितकाच वेळ देतात. भेटण्यास आलेल्या माणसाला त्यांच्याकडून कधी नाराजीची वेळ येणार याची काळजी घेतात उद्योगसमूहात त्यांच्याबद्दल दिलेला शब्द पाळणारा शब्दाचा पक्का अशी ओळख. विनू बाबांची निर्माण झाली आहे. कृष्णाची विद्यापीठ आणि जयवंत शुगर या दोन समूहांची जबाबदारी पेलताना त्यांची मोठी कसरत होते पण या दोन्हीही संस्थांचा विस्तार पाहता त्यांच्या बौद्धिक कल्पकतेची व कौशल्याची सर्वांनाच आठवण झाल्याशिवाय राहत नाही
. नर्सिंग इंजिनिअरिगच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कॅम्पस इंटरव्यू आणि परदेशी नोकरीसाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असतो आज अखेर नर्सिंग क्षेत्रातून पदेशात नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या मध्ये विनू बाबांचे मोठे योगदान आहे त्यामुळे परदेशात लाखो रुपयाची पॅकेज घेऊन कराड तालुक्यात स्वतःचे आर्थिक स्थान बळकट करणारी अनेक कुटुंबे आहेत याची श्रेय विनू बाबांना जाते. अनेक व्यवसाय करणाऱ्या. व्यावसायिकांना व्यवसायातील. बारकावे कसे व काय असावेत याबाबत ते सातत्याने मार्गदर्शन करतात अनेकदा निधी उपलब्धते बद्दल कोणत्या योजना काय आहेत त्यासाठी कुठून निधी उपलब्ध केला जातो याबाबतही मार्गदर्शन लाभते कोणत्याही क्षेत्रात काम करताना झोकन देऊन काम करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने पाळली आहे. राजकारणा पुरते राजकारण आणि नंतर समाजकारण अशी भूमिका जोपासण्याचे काम करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे विरोधकांनाही हेवा वाटणारा माणूस म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
विनू बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
“राम – लक्ष्मणाची जोडी”
डॉ. सुरेश भोसले यांची दोन्ही मुले आज कृष्णा उद्योग समूहाचे माध्यमातून समाजकारणात सक्रिय आहेत डॉ अतुल भोसले हे राजकारणात अत्यंत हिरीने पुढे जात आहेत अशावेळी रामायणातील राम आणि लक्ष्मण ज्या पद्धतीने कार्यरत असतात त्याच पद्धतीने हे दोन बंधू कार्यरत आहेत. कृष्णा उद्योग समूहात राम लक्ष्मण अशी जोडी येथे कार्यरत आहे डॉ अतुल भोसले समाजकारणात काम करत असताना त्यां रामरूपी बंधूंना लक्ष्मणाची साथ देण्याचे काम विनू बाबा करत आहेत.