सातारा जिल्हाहोम

सातारच्या शांतता रॅलीला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा 

कराडला नियोजन बैठकीत मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुक्यातर्फे आवाहन

कराड/प्रतिनिधी : –

सातारा येथे 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीला कराड तालुक्यातून लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुक्यातर्फे करण्यात आले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी सदर शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुक्यातर्फे नोयोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीबाबत गावोगावी जनजागृती करणे, तालुक्यात जरांगे-पाटील यांचे आगमन झाल्यानंतर वारंजी फाटा (कराड) व उंब्रज येथे मराठा क्रांती मोर्चा, कराड तालुका आणि पाटण तालुक्यातर्फे स्वागत करणे, आठ ऑगस्टला कराड दक्षिण व कराड उत्तर मतदारसंघातील विद्यमान आमदार, लोकप्रतिनिधींची मराठा समाजाला 50 टक्यांच्या आतील ओबीसी मधून आरक्षण मिळावे व सगेसोयरेचा अध्यादेश काढण्याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट विचारणे आदी निर्णय घेण्यात आले.

तत्पूर्वी, सदर बैठकीत खा. अनिल बोंडे यांनी जरांगे-पाटील यांना अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याबद्दल निषेध नोंदवण्यात आला.

Related Articles