सातारा जिल्हाहोम

संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची निष्ठा व लोकहिताच्या बळावर देशात भाजपची यशस्वी वाटचाल – आ.डॉ. अतुलबाबा भोसले 

कराड दक्षिण मंडलात पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचा शुभारंभ 

कराड/प्रतिनिधी : –

संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी घेतलेले ठाम निर्णय यांच्या बळावर देशात भारतीय जनता पार्टीची यशस्वी वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

पक्षाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त कराड दक्षिण मंडलच्यावतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भाजपा कराड दक्षिण मंडलमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन्स येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्‌घाटन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहित, सुशासन आणि सर्वांगीण विकास या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत भाजपाने देशातील जनतेचा दृढ विश्वास संपादन केला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्याचा ध्यास बाळगून कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे.

या निवासी प्रशिक्षण शिबिरात पक्ष सदस्य नोंदणी, पक्षाचा इतिहास व विकासकार्य, सोशल मीडिया व ए.आय., नमो अॅप व सरल अॅप, केंद्र व राज्य शासनाच्या योजना व कामगिरी, बूथ व्यवस्थापन, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनकार्य आणि जनसंघ ते भारतीय जनता पक्षापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास याविषयी विविध वक्त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शैलजा शिंदे, प्रियांका साळुंखे, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदाताई यादव, पंचायत समिती सदस्य अर्जुन कराळे, पै. धनंजय पाटील, सौ. वर्षा निकम, सौ. माधवी पाटसुपे, कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, शिवाजीराव पवार, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, बांधकाम सभापती हणमंतराव जाधव, माजी जि.प. सदस्य शंकराव खबाले, पक्षाचे राज्य परिषद सदस्य हर्षवर्धन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष पिनू जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, रेणूताई येळगावकर, तेजस जमदाडे, सुहास जगताप, माजी नगरसेवक शिवाजीराव पवार, वैष्णवी वायदंडे, किशोरी शिंदे, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगरसेविका स्मिता हुलवान, प्रदेश सचिव कविता कचरे, डॉ. राजेंद्र पाटील, कराड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष माणिकराव पाटील, मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, प्रवीण साळुंखे, शंकर निकम व सुषमा लोखंडे उपस्थित होते. या शिबिरास भाजपाचे बूथ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles