सातारा जिल्हाहोम

विद्या मोरे यांचा ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्काराने सन्मान 

पत्रकारिता आणि सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रसाराची दखल; फलटण रिजन कॉन्फरन्समध्ये गौरव

कराड/प्रतिनिधी : – 

लायन्स क्लबच्या कॅबिनेट ऑफिसर (युथ) म्हणून कार्यरत असलेल्या लायन विद्या मोरे यांना फलटण येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसोबतच सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रसिद्धीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

विभागीय सभापती MJF लायन नीलम पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी विद्या मोरे यांच्या कार्याचा गौरव करताना, लायन्स क्लबच्या विविध उपक्रमांना व्यापक स्तरावर पोहोचवण्यात त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले.

झोन चेअरमन मंजिरी खुस्पे यांनीही विद्या मोरे यांच्या कार्याचे अभिनंदन करत, त्यांनी पीआरओ म्हणून केलेले काम संस्थेची प्रतिमा अधिक भक्कम करण्यास कारणीभूत ठरल्याचे नमूद केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे लायन्स क्लबचे उपक्रम स्थानिक तसेच प्रादेशिक स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्या मोरे यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम साधणाऱ्या कार्याला योग्य ती मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

विद्या मोरे यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, लायन्स क्लबच्या उद्दिष्टांचा प्रसार अधिक व्यापक करण्यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Related Articles