कोयना सहकारी वाहतूक संस्थेच्या ताफ्यात ‘अशोक लेलंड’चा नवा ट्रक दाखल

कराड/प्रतिनिधी : –
सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या कराड येथील कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेच्या ताफ्यात अत्याधुनिक ‘अशोक लेलंड’ कंपनीचा नवा ट्रक समाविष्ट करण्यात आला आहे. संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संस्थेच्या या नव्या वाहनाचे लोकार्पण व पूजन सोहळा शनिवारी (दि. १४) उंडाळे येथील स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर उत्साहात पार पडला.
या नवीन ट्रकच्या खरेदीसाठी स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे आर्थिक सहकार्य लाभले असून, मान्यवरांच्या हस्ते वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन तुकाराम उर्फ टी. आर. पाटील म्हणाले, कोयना वाहतूक संस्था ही सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्था आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्यक्षम व्यवस्थापनाच्या बळावर संस्थेची प्रगती सातत्याने होत आहे. नव्या वाहनांच्या समावेशामुळे संस्थेची वाहतूक सेवा अधिक सक्षम होऊन ग्राहकांना दर्जेदार सेवा देता येणार आहे.
या सोहळ्याला स्वा. सै. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे, कोयना सहकारी वाहतूक संस्थेचे चेअरमन तुकाराम (टी. आर.) पाटील, व्हा. चेअरमन धनाजी पाटील, कराड पंचायत समिती सदस्य नितीन थोरात, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक शिवाजी शिंदे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ मोरे, तसेच पतसंस्थेचे संचालक सर्जेराव थोरात, हिंमत थोरात, राहुल यादव, अशोक चव्हाण, बळवंत पाटील, अशोक पोळ, आनंदराव माने, लालासो पवार, कोयना वाहतूक संस्थेचे संचालक विशाल पाटील, काशिनाथ कारंडे, गोतपागर, उंडाळे विकास सोसायटीचे चेअरमन ए.बी. पाटील (सर), दूध संस्थेचे चेअरमन आनंदराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील, सर्जेराव पाटील, पतसंस्थेचे व्यवस्थापक अधिकराव शेंळके, कोयना सहकारी वाहतूक संस्थेचे सचिव दत्ताजी देशमुख व संस्थेचे सर्व सेवक उपस्थित होते.
यावेळी गोंदी विकास सोसायटीच्या सदस्यपदी लालासाहेब पवार यांची निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेच्या यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातील प्रगतीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.



