सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याच्यावतीने ऊस तोडणी कामगारांना आयुष्मान कार्डचे वितरण

कराड/प्रतिनिधी : –

रेठरे बु. येथील य.मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्थलांतरित ऊस तोडणी कामगारांसाठी आयुष्मान भारत कार्डचे वितरण कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

यावेळी संचालक बाबासो शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रियांका साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजकुमार पवार, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, पर्यावरण अधिकारी सुयोग खानविलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, कृष्णा सहकारी बँकेचे माजी संचालक तातोबा थोरात, शिक्षिका राधिका लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याशी संबंधित पात्र स्थलांतरित कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत व कॅशलेस आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, साखर उद्योगात मोलाचे योगदान देणाऱ्या कष्टकरी कुटुंबांना आरोग्य सुरक्षा व आवश्यक सहाय्य प्रदान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते ऊस तोडणी कामगारांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी साखर शाळेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles