सातारा जिल्हाहोम

नगरसेविका तेजश्री पाटसकर यांच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –

शहरातील प्रभाग क्र. ७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सौ. तेजश्री सुदर्शन पाटसकर यांच्या स्वतंत्र जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (दि. २३) दुपारी उत्साहात संपन्न झाले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

या कार्यालयाचे उद्घाटन सौ. आशा विष्णू पाटसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयसिंह यादव, जयंतकाका पाटील, तसेच विष्णूकाका पाटसकर, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नगरसेविका सौ. पाटसकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. शहरातील मूलभूत सुविधांबाबत पाठपुरावा करणे, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करणे आणि विकासकामांना गती देणे या उद्देशाने हे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आल्याचे सौ. तेजश्री पाटसकर यांनी सांगितले.

नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना थेट कार्यालयात मांडाव्यात आणि या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Articles