वारुंजीत अजित पवारना श्रद्धांजली

कराड / प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्याची बातमी संपूर्ण राज्याला हादरवून गेली. त्यांच्या अकाली निधनाने सर्वसामान्यांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींमध्ये शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वारुंजी (कराड) येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
सत्यजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या श्रद्धांजली सभेत अजित पवार यांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि सर्वसमावेशक विचारांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या विविध घटकांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमास वारुंजी परिसरातील तसेच कराड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये सुनीलदादा पाटील (जिल्हाध्यक्ष, किसान सभा – राष्ट्रवादी काँग्रेस),राजेश पाटील (वाठारकर) (माजी संचालक, सातारा डीसीसी),प्रकाश पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, कराड),नामदेवराव पाटील (तालुकाध्यक्ष, कराड दक्षिण – काँग्रेस),राजुदादा पाटील (समन्वयक, राष्ट्रवादी काँग्रेस),तुषार पवार (एनसीपी औद्योगिक सेल),मोईन नदाफ (अध्यक्ष, विद्यार्थी सेल) यांच्यासह हा. मुस्ताक फकीर, मन्सूरभाई बागवान, कलीम नदाफ, आयुब पटेल, खलीलभाई फकीर, फारुक खान, हा. राजुभाई नदाफ, अल्हाज नदाफ, हकीम खान, साद नदाफ, अन्नसो पाटील, नयन पाटील, सत्यजीत पाटील, महेश पाटील, जाधव साहेब, धनंजय देशमुख, विकास पाटील, लिमरास बागवान, अफान बागवान, हाफिज शब्बीर, अभिजीत चव्हाण, माजीद पटेल, रफिक सय्यद, फकरुद्दीन शेख, रमजान मुल्ला, जमीर नदाफ आदी मान्यवर व असंख्य ‘दादा’प्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांचे प्रशासनावरील वर्चस्व, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेले निर्णय आणि निर्भीड नेतृत्व यांचा उल्लेख केला. ते जात-पात, धर्मभेद न मानता सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे नेते होते, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या शोकसभेचे आयोजन समीर बागवान यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले.


