कराडमध्ये उद्यापासून ‘होमथॉन 1.0’ भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पो
महिला सन्मान व मेगा लकी ड्रॉचे विशेष आकर्षण

कराड, दि. 21
कराडच्या बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारा भव्य प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियल एक्स्पो होमथॉन 1.0, नॅरेडको कराड यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य एक्स्पो दि. 23 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत बैल बाजार रोड, गणपती मंदिर शेजारी, मलकापूर, कराड येथे होणार असल्याची माहिती नरेडको कराडचे अध्यक्ष अरविंद खबाले यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 23) सायं. 4 वा. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते होणार असून पर्यटन व खनिकर्म तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. तसेच माजी सहकार व पणन मंत्री मा. बाळासाहेब पाटील, यांची प्रमुख उपस्थिती असणार असून कराड नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मलकापूरचे नूतन नगराध्यक्ष तेजस सोनवले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
खबाले म्हणाले, या एक्स्पोमध्ये घर, फ्लॅट, प्लॉट, बिल्डिंग प्रोजेक्ट्स, आधुनिक बांधकाम साहित्य, तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचे सादरीकरण करण्यात येणार असून नागरिकांना थेट माहिती, सल्ला व प्रदर्शनात घर किंव्हा बांधकाम साहित्य खरेदी करणाऱ्यास आकर्षक डिस्काउंट व ऑफर्स मिळणार आहेत. घराच्या उभारणीत महिलांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनात महिलांसाठी मेगा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला एक कूपन विनामूल्य देण्यात येणार आहे. या कूपनद्वारे सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसांची संधी मिळणार असून दहा महिलांना ओरिजिनल पैठणी साडी, तसेच प्रथम क्रमांकाला पैठणी व 1 ग्रॅम सोन्याची नेकलेस जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हा मेगा लकी ड्रॉ दि. 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता जाहीर करण्यात येणार असून, तो कृष्णा उद्योग समुहाच्या प्रमुख आदरणीय सौउत्तरा भोसले( आईसाहेब) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
होमथॉन 1.0 हा उपक्रम कराड व परिसरातील नागरिकांसाठी घरखरेदी, बांधकाम साहित्य, गुंतवणूक आणि महिलांसाठी सन्मान व बक्षिसांची अनोखी संधी देणारा ठरणार असून, कराडच्या बांधकाम क्षेत्राला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीअरविंद खबाले यांनी व्यक्त केला आहे.
नरेडको कराडचे उपाध्यक्ष मा सुभाष लोंढे या नियोजनासाठी विशेष प्रयत्नशील व कार्यरत असून सचिव संदीप शिंदे, खजिनदार अजित पाटील, संचालक मंडळ किशोरकुमार साळुंखे, पंकज बागल , प्रशांत मोहिते , विजय जगताप , मंगेशजी हिरवे, रविराज शिंदे, अजित साळुंखे, धनंजय येडगे, सौरभ तवटे,मच्छिंद्र कुंभार, विजय गायकवाड ,विक्रम घारे , अनुराज थोरात, प्रवीण पाटील आदी मान्यवर प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्नशील आहेत.



