सातारा जिल्हाहोम

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शेवटच्या दिवशीच २५७ अर्ज

एकूण ३३६ नामनिर्देशनपत्रे दाखल

कराड/प्रतिनिधी : – 

सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज, बुधवार (दि. २१ जानेवारी) या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. जिल्हा परिषद गटासाठी आज एकाच दिवशी ९६ तर पंचायत समिती गणासाठी १६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे आजअखेर जिल्हा परिषद गटासाठी एकूण १३२ आणि पंचायत समिती गणासाठी २०४ असे एकूण तब्बल ३३६ विक्रमी नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे व प्रताप पाटील उपस्थित होते.

या निवडणुकीत उदयसिंह पाटील – उंडाळकर आणि देवराज पाटील यांच्यासह दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत मोठीच सुरज निर्माण झाले आहे. यासह अन्य प्रतिष्ठेच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय दाखल झालेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे; पाल जि. प. गटातून देवराज पाटील (नॅशनल काँग्रेस पार्टी शप/अपक्ष), सर्जेराव खंडाइत (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), अजिंक्य माने (भाजप), शंकर वायदंडे (बसपा), नयनेश निकम (शिवसेना), सविता कणसे (रासप).

उंब्रज जि. प. गटातून रणजीत जाधव (भाजप), रणजीत कदम (मनसे), दादा कांबळे (वंचित बहुजन आघाडी/अपक्ष), संग्रामसिंह जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), महेशकुमार जाधव (भाजप), सुधाकर जाधव (नॅशनल काँग्रेस पार्टी शप), महादेव साळुंखे (शिवसेना), विनोद जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), जयसिंह पाटील (नॅशनल काँग्रेस पार्टी शप).

मसूर जि. प. गटातून दिपाली खोत (अपक्ष), सोमनाथ चव्हाण (शिवसेना/अपक्ष), प्रमोद गायकवाड (भाजप/अपक्ष), प्रथमेश गायकवाड (अपक्ष), पवन निकम (भाजप/अपक्ष), सचिन उर्फ कुलदीप क्षीरसागर (अपक्ष), विजयसिंह जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), जयवंतराव जगदाळे (भाजप), नंदकुमार जगदाळे (अपक्ष).

कोपर्डे हवेली जि. प. गटातून मेघा चव्हाण (भाजप), कोमल साळवे (भाजप/अपक्ष), स्वाती पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट/अपक्ष), कली मुन्नीसा मुल्ला (अपक्ष), स्वाती चव्हाण (भाजप/अपक्ष), शबाना पटेल (वंचित बहुजन आघाडी).

सैदापूर जि. प. गटातून सचिन नांगरे (भाजप), सागर शिवदास (भाजप), अनिकेत साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रफुल्ल कांबळे (भाजप/अपक्ष), तुषार लोंढे (नॅशनल काँग्रेस पार्टी), प्रफुल्ल वीर (भाजप), नरहरी जानराव (अपक्ष), निखिल शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट), मिलिंद वाघमारे (शिवसेना), अमर तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी/अपक्ष), धर्मेंद्र कांबळे, सच्चिदानंद आवळे, राहुल जानराव, अक्षय तुपे, वैशाली वाघमारे (सर्व अपक्ष), हेमंत लादे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार गट), अशोक रामुगडे, मुरलीधर कांबळे (नॅशनल काँग्रेस पार्टी शप), विवेक बारमन (रयत क्रांती पक्ष).

वारुंजी जि. प. गटातून श्वेता पाटील (भाजप), सुनंदा पाटील व भाग्यश्री पाटील (अपक्ष).

तांबवे जि. प. गटातून धनंजय ताटे, शंकर पाटील, विठोबा पाटील, विजय चव्हाण, तात्यासो बाबर, विनोद पाटील (भाजप), जगदीश पाटील, स्वप्निल पवार, सतीश पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), तानाजी पवार, विक्रम पाटील (शिवसेना), प्रदीप पाटील (अपक्ष).

विंग जि. प. गटातून शैलजा शिंदे (भाजप), आराधना काटू व अनुराधा बंडगर (राष्ट्रवादी काँग्रेस).

कार्वे जि. प. गटातून जयश्री जगताप (राष्ट्रीय समाज पक्ष), विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट), अनुश्री थोरात, धनश्री थोरात, विद्याताई जगताप (भाजप).

रेठरे बुद्रुक जि. प. गटातून प्रियंका साळुंखे, सारिका साळुंखे (भाजप), अंजली साळुंखे, कोमल साळुंखे (अपक्ष), अंजली सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस).

काले जि. प. गटातून मनीषा पाटील, शिवानी मोटे, दयानंद पाटील, गोविंद गावडे, शंकर गावडे (भाजप), उषाताई पाहुणे, विकास अनुसे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट).

येळगाव जि. प. गटातून प्रवीण साळुंखे, सचिन बागट, बळवंत पाटील (भाजप), उदयसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस).

पंचायत समिती निवडणूक 

पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय दाखल झालेले उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे; पाल पं. स. गणातून सूर्यकांत पडवळ (भाजप), प्रताप चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), विजय यादव, प्रशांत कदम (भाजप), युवराज चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), योगीराज सरकाळे (अपक्ष), प्रमोद ढाणे (शिवसेना).

चरेगाव पं. स. गणातून धैर्यजा माने, संजीवनी देशमाने, अनिता भाकरे, सुजाता भाकरे (भाजप), गांधारी पुजारी, संगीता मोरकळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), मुक्ता जाधव (शिवसेना).

उंब्रज पं. स. गणातून शशिकला फणसे, पूर्वा बेडके, जयश्री ढवळे, संजीवनी देशमाने (भाजप), संगीता चव्हाण, वर्षा माळी (नॅशनल काँग्रेस पार्टी शप), प्रियांका वाघमारे (शिवसेना).

तळबीड पं. स. गणातून बाळासाहेब पवार, संग्राम पवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/शिवसेना/अपक्ष), जयवंत मोहिते, विजय मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शप), कृष्णत पवार, उमेश मोहिते (भाजप), दिनेश घाडगे (अपक्ष/शिवसेना), मिथुन शिंदे (नॅशनल काँग्रेस पार्टी).

वडोली (भि.) पं. स. गणातून दिपाली खोत, कोमल यादव, उषा गायकवाड (भाजप/अपक्ष), अलका जाधव, मयुरी साळुंखे (भाजप), प्रियांका पवार, विद्या सावंत (अपक्ष).

मसूर, वाघेरी, कोपर्डे हवेली, हजारमाची, सैदापूर, वारुंजी, कोयना वसाहत, सुपने, तांबवे, कोळे, विंग, गोळेश्वर, शेरे, रेठरे बुद्रुक, काले, कालवडे, सवादे व येळगाव पं. स. गणांमधून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगण तापवले आहे.

Related Articles