वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

कराड/प्रतिनिधी : –
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस सुर्ली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि अभूतपूर्व गर्दीत साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत त्यांच्या सुर्ली येथील फार्म हाऊसवर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच नागरिकांची अखंड रीघ लागली होती. प्रत्यक्ष भेटींसह फोन व व्हॉट्सअॅपद्वारेही हजारोंच्या संख्येने शुभेच्छांचा वर्षाव झाल्याने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.
वाढदिवसानिमित्त सकाळी वेताळ यांनी आपले कुलदैवत श्री. ज्योतिबा (कोल्हापूर), तसेच मार्तंड देवस्थान, पाली येथे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेत सामाजिक बांधिलकी जपत आनंदराज फार्म हाऊस येथे गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.
दिवसभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार विक्रांत पाटील, मंत्री भरत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जि. प. सभापती भीमराव पाटील, पै. धनाजी पाटील, राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, श्रीनिवास जाधव, कराड उत्तर संयोजक महेशकुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, किसान मोर्चा उपाध्यक्ष विकास गायकवाड, गणेश घोरपडे, शंकरराव शेजवळ, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई घार्गे, लाडकी बहीण अध्यक्षा दिपाली खोत, सूर्यकांत पडवळ, नवीन जगदाळे, जितेंद्र मोरे, रामचंद्र भोसले, राजेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.
तसेच रयत क्रांती संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थांचे चेअरमन-व्हाईस चेअरमन, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जनतेशी असलेली घट्ट नाळ, सामाजिक भान आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस कराड उत्तरमध्ये पुन्हा एकदा लोकसहभागाचा उत्सव ठरला.



