सातारा जिल्हाहोम

जेईई मेन्सच्या यशासाठी फिजिक्स-मॅथ्सवर भर द्या – सुभित यादव

कराड/प्रतिनिधी : –

जेईई मेन्स परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे आवाहन सुभित आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीचे अध्यक्ष सुभित यादव यांनी केले.

श्री. यादव म्हणाले, रसायनशास्त्र हा तुलनेने गुण मिळवून देणारा विषय असला, तरी भौतिकशास्त्रात आधुनिक भौतिकशास्त्र, किरण प्रकाशिकी, ध्वनी, अल्टरनेटिंग करंट, तसेच उष्मागतिकी (थर्मोडायनॅमिक्स) या घटकांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मागील किमान दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास परीक्षेचा पॅटर्न अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो.

गणित विषयाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा विषय पूर्णतः सरावावर आधारित आहे. सातत्याने आणि नियोजनबद्ध सराव केल्यास गणितात चांगले गुण मिळवणे निश्चित शक्य आहे. सध्या परीक्षेसाठी कालावधी उपलब्ध असल्याने, विद्यार्थ्यांनी वेळेचा योग्य वापर केल्यास त्यांना निश्चितच त्याचा मोठा फायदा होईल, असा श्री. यादव यांनी व्यक्त केला.

Related Articles