सातारा जिल्हाहोम

स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात श्वानप्रेमींच्या उत्साहाला उधाण

दहा गटांत रंगली श्वान स्पर्धा; वडगाव हवेलीच्या वरद जगताप यांचा लॅब्राडोर ठरला ‘चॅम्पियन ऑफ द शो’

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या सोमवारच्या चौथ्या दिवशी श्वान प्रदर्शन व स्पर्धा पार पडली. श्वानप्रेमींचा या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये स्पर्धेत राखणीच्या श्वानापासून ते परदेशी श्वानांच्या विविध जाती श्वानप्रेमींना पाहता आल्या. वेगवेगळ्या दहा गटांमध्ये स्पर्धा पार पडली. स्पर्धेत ‘चॅम्पियन ऑफ द शो’ चा मानकरी वडगाव हवेली येथील वरद नितीन जगताप यांचा लॅब्राडोर जातीचा श्वान ठरला.

या श्वान प्रदर्शन स्पर्धेसाठी पिटबुल, लॅब्राडोर, डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, ग्रे हाॅंड, रॉटविलर, अल्सेशियन… पामेरियन, देशी पश्मी आणि कारवानी, आणि लहान आकाराचे ‘बिगुल’ संबोधले जाणारे श्वान, कोल्ह्यासारखे दिसणारे ‘हासी’ श्वान या प्रदर्शनात सहभागी झाले होते. प्रत्येक श्वानाची खासियत आणि वैशिष्ट्ये वेगवेगळी होती. त्यांच्या किंमतीही हजारापासून काही हजारापर्यंत असल्याचे सांगण्यात आले. श्वान मालक त्यांचे संगोपन कसे करत आहेत, याबाबतची माहिती अनेकांना संबंधित मालकांच्याकडे चौकशी करून मिळवता आली.

सकाळच्या सत्रात सभापती सतीश इंगवले यांच्या हस्ते व उपसभापती नितीन ढापरे, बाजार समितीचे संचालक मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे आदी मान्यवरांसह पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून श्वान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनामध्ये विविध भागातून श्वान मालक त्यांच्या श्वानांना घेऊन सहभागी झाले होते.

या स्पर्धेत गटनिहाय अनुक्रमे पहिले तीन क्रमांक विजेते व त्यानंतरचे उत्तेजनार्थ याप्रमाणे –

पामेरियन गट –

विक्रांत तोमर (कराड), जयराज अरविंद पोतदार (आटके), शुभम संजय चव्हाण (कोळेवाडी), विलास सखाराम येलोंडे (कराड).

कारवान / मुधोळ होंड –

दत्तात्रय भिकू खांडेकर (अंगापूर), कुबेर विठ्ठल भोसले (धोंडेवाडी), शिवराज सचिन भोसले (धोंडेवाडी), अविनाश हरिभाऊ जाधव (बाबरमाची).

डॉबरमॅन –

अनिल सदाशिव शेडगे (धोंडेवाडी), संकेत महेंद्र भोसले (खरशी), जे जे पेट्स (कराड).

अल्सेशियन / जर्मन शेफर्ड –

अजित बबन खडंग (वारुंजी), पृथ्वी शंकर भोपते (कराड), प्रत्येक प्रताप भोसले (कराड).

लॅब्राडोर –

वरद नितीन जगताप (वडगाव हवेली), श्रीराज नितीन लवटे (मलकापूर), ध्रुव पेटस (कराड).

ग्रे हाॅंड –

धनाजी भगवान भोसले (मलकापूर), ओंकार जगन्नाथ कांबळे (राजमाची), आमीरभाई शेख (मलकापूर), संतोष निवृत्ती शिंदे (मलकापूर).

पश्मी –

उत्तम रामचंद्र चव्हाण (कोपर्डे हवेली), सत्यम मंगेश होलमुखे (तडसर), सचिन प्रकाश पवार (बाबरमाची).

रॉटविलर –

मंगेश शंकरराव चव्हाण (वारुंजी), शुभम कैलास कसबे (पोतले), रितेश कैलास कसबे (पोतले).

बॉक्सर / पिटबूल –

स्वराज राजेंद्र माने (कराड), साहिल आण्‍णासो शिंदे (विरवडे), गौरव अविनाश जंगम (रहिमतपूर), सागर पाटसुपे (कोडोली).

युटिलिटी –

मनोज बाबुराव पवार (मलकापूर), सुधीर दादासाहेब जाधव (मलकापूर), संग्राम निवासी इंगवले (रिसवड), विश्वजीत जगदीश भंडारे (केसे), सुश्रुत चनाप्पा महाजन (कराड).

चॅम्पियन ऑफ द शो –

वरद नितीन जगताप (वडगाव हवेली) – लेब्राडाॅर.

दरम्यान, या प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना युवा नेते आदिराज पाटील उंडाळकर, लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या स्नुषा व रयत साखर कारखान्याचे चेअरमन एडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या सुविध्य पत्नी सौ. सुचित्रादेवी उदयसिंह पाटील-उंडाळकर , कु. चेतना उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्यासह बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक संभाजी चव्हाण, गणपत पाटील, कोयना दूध संघाचे व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव व इतर मान्यवरांच्या आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले.

Related Articles