अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कराड उत्तर भाजपातर्फे अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
भारताचे थोर राजकारणी, कुशल कवी, प्रभावी वक्ते आणि तीन वेळा पंतप्रधानपद भूषवणारे भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती कराड उत्तर भारतीय जनता पार्टीच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमास कराड उत्तर मतदारसंघाचे नेते व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चव्हाण, राजेंद्र मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड उत्तर भाजप व रामकृष्ण वेताळ यांच्यावतीने दरवर्षी २५ डिसेंबर हा दिवस माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. याच अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमात वाजपेयी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, राष्ट्रहिताच्या धोरणांचा आणि समन्वयवादी राजकारणाचा गौरव करण्यात आला.
यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी आपल्या भाषणात स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवनकार्य उपस्थितांसमोर मांडले. देशाच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय, पायाभूत सुविधा, राष्ट्रीय महामार्ग विकास, परराष्ट्र धोरण आणि सशक्त लोकशाही मूल्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
सागर शिवदास, प्रमोद गायकवाड, राजेंद्र चव्हाण व राजेंद्र मोहिते यांनीही वाजपेयी यांच्या आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास नवीन जगदाळे, जितेंद्र मोरे, युवराज चव्हाण, सूर्यकांत पडवळ, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब पोळ, जयसिंग डांगे, विश्वास सावंत, सचिन नांगरे, माजी उपसरपंच हिंदूराव पिसाळ, बाबुराव चौधरी, बाबासो बनसोडे, अश्विनी पळसे, गौरीताई चौरंगे, दिपालीताई खोत, सागर हाके, बाळासो पवार, अमित पाटील, सागर चव्हाण, अक्षय चव्हाण, वैभव शेजवळ, मुकुंद गोळे, हरीश कणसे, अमित पुके यांच्यासह कराड उत्तर मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रासाठीचे योगदान आणि आदर्श नेतृत्व आजच्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.



