सातारा जिल्हाहोम

पेरले ग्रामपंचायत व कोपर्डे हवेलीतील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पेरले ग्रामपंचायत व कोपर्डे हवेलीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी संग्रामबापू घोरपडे उपस्थित होते.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश माजी आमदार बाळासाहेब पाटील गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या घडामोडीमुळे कराड उत्तरमधील भाजपची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थिर असल्याने विकासाच्या धोरणावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. कराड उत्तर मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशामुळे राजकीय वातावरण तापले आहे.आमदार मनोजदादा घोरपडे यांनी गेल्या एक वर्षात विकासकामांचा धडाका लावत सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यपद्धती, सर्वसमावेशक भूमिका व विकासाभिमुख नेतृत्वामुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते प्रभावित होऊन भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या पक्षप्रवेशात पेरले गावच्या सरपंच राणी गुरव, माजी उपसरपंच प्रशांत कदम, प्रमोद कदम, संतोष कुंभार, जयश्री जाधव, प्रताप कुंभार, गुणवंत कदम, विशाल भोसले, वृषभ चव्हाण, मोहन जाधव, विकास कदम, विकास चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अमोल खटावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तर कोपर्डे हवेली परिसरातून पै. जालिंदर चव्हाण, रंगराव चव्हाण, सोपान चव्हाण, धनाजी चव्हाण, नंदकुमार चव्हाण, महेश चव्हाण, कैलास चव्हाण, अलंकार चव्हाण, विजय चव्हाण, अमोल पवार यांच्या उपस्थितीत शुभम चव्हाण, शुभम नाईक, हणमंत चव्हाण, सागर चव्हाण, लक्ष्मण तुपे, संकेत तुपे, ऋषिकेश गुरव, आकाश नाईक, तसेच माजी नितीन चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, अनिल चव्हाण, विकास चव्हाण, महेश खरात, रोहित जाधव, मयूर होवाळ, राज जरग, संग्राम तुपे, प्रवीण चव्हाण, ज्ञानदेव चव्हाण (पिंटू), राजेंद्र हजारे, सागर बुधे, अभिजित काशीद, राहुल साळवे आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

आमदार घोरपडे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे विकासकामांसाठी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या गावातील जुने सहकारी व नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून सर्वांना योग्य सन्मान दिला जाईल आणि कराड उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles