स.गा.म. महाविद्यालयातील सौ. पूनम होनकळसे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार

कराड/प्रतिनिधी : –
येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमधील फॅशन डिझायनिंग विभागातील प्रा.सौ. पूनम होनकळसे यांना आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन, पुणे यांच्याकडून बेस्ट फॅशन डिझायनर म्हणून ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ प्राप्त झाला. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचे अभिनंदन केले.
त्याचबरोबर महाविद्यालयातील कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. रमेश पोळ, सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. उत्तम मोरे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. माधुरी कांबळे, प्रा.डॉ. सर्जेराव चिले, उपप्राचार्य प्रा.एस.ए. पाटील, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा.डॉ.ए.के. पाटील, आय.क़्यु.ए.सी.चे चेअरमन प्रा.डॉ. गिरीष कल्याणशेट्टी, रजिस्ट्रार डॉ. अरुणकुमार सकटे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



