कराड अर्बन बँकेच्या संचालकपदी उल्हास शेठ यांची निवड

कराड/प्रतिनिधी : –
कराड अर्बन सहकारी बँकेच्या संचालन मंडळातील नैमित्तिक रिक्त झालेल्या संचालकपदासाठी येथील सुप्रसिद्ध अडत व्यापारी उल्हास तुलशीराम शेठ यांची निवड करण्यात आली. उपनिबंधक सहकारी संस्था, कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यासी अधिकारी अपर्णा यादव यांनी निवड प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
निवडीनंतर आयोजित सत्कार समारंभात अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे तसेच सर्व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते उल्हास शेठ यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बँकेचे सर्व मान्यवर आणि संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी आभर मानत उल्हास शेठ यांच्या निवडीमुळे बँकेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.



