सातारा जिल्हाहोम

कराड उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – आ. मनोज घोरपडे

तासवडेत विविध विकासकामांचे भूमिपूजन, गावाला ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा संकल्प

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते तासवडे, ता. कराड येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. महामार्गावरील महत्त्वाचेव व औद्योगिक क्षेत्र म्हणून वेगाने विकसित होत असलेले तासवडे गाव ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा संकल्प यावेळी आमदार घोरपडे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला महेशबाबा जाधव, उमेश मोहिते, भिकूअण्णा जाधव, अमित जाधव, बाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, तसेच सरपंच दिपाली जाधव, उपसरपंच मनीषा जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी भाषणात आमदार घोरपडे म्हणाले, पूर्वी कराड उत्तरमधील काही गावांना केवळ तीन, पाच किंवा दहा लाखांचा निधी मिळायचा. पण आपण विकासाचा बदल केला आणि आता केंद्र व राज्य सरकारच्या विविध हेडमधून मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. आम्ही हा सर्व निधी योग्य पद्धतीने वापरून कराड उत्तरचा सर्वांगीण विकास घडवणार आहोत.

ते म्हणाले, सामान्य लोकांच्या अडीअडचणी जाणून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत गावोगावी संपर्क दौरे करतो. माझ्याकडे येण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही. साधासुधा माणूसही थेट माझ्याशी भेटू शकतो. कराड उत्तरमधील मागील पंचवीस वर्षांचा बॅकलॉग हटवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच दिपाली जाधव यांनी, गावातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडत विकासकामांना गती देण्याची मागणी केली. यावेळी विलास माने, लक्ष्मण जाधव, रंजीत जाधव, निलेश डूबल, संदीप माने, शंकर पाटील, अरुण पवार, प्रकाश पवार, तसेच गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

तासवडे गावातील मान्यवरांचा भाजप प्रवेश

तासवडे गावातील माजी सरपंच राजेंद्र जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच सुभाष जाधव, शालेय समिती अध्यक्ष सुनील जाधव, माजी शालेय समिती अध्यक्ष शामराव जाधव यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Related Articles