सातारा जिल्हाहोम

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कराडमध्ये बाबासाहेबांना अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतावादी तत्त्ववेत्ते आणि सामाजिक परिवर्तनाचे अध्वर्यू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील त्यांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.

विधान परिषदेचे माजी आमदार आनंदराव पाटील यांनी, डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सामाजिक न्याय, बंधुता, समता आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आणि प्रेरक असल्याचे मत आनंदराव पाटील यांनी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास आप्पासाहेब गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निसार मुल्ला, शुभम लादे, किशोर आठवले, संतोष थोरवडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती लाभली.

Related Articles