खोडशी येथे नामदेव पाटील यांच्या हस्ते 20 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन

कराड/प्रतिनिधी : –
खोडशी (ता. कराड) येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार फंडातून आणि नामदेव पाटील (आप्पा) यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी रोहिदास महाराज नगर येथील रस्ता काँक्रीटीकरण व गटार बांधकाम, तसेच महादेव मंदिराजवळील रस्ता काँक्रीटीकरणासाठी मंजूर झालेल्या 20 लाख रुपये निधीच्या कामांचे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील होते. त्यांच्या हस्ते रस्ता व गटार बांधकामाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमास भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा सोसायटीच्या संचालिका सौ. सुनंदा नामदेव पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, कराड दक्षिण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. वैशाली जाधव, रविंद्र बडेकर यांसह खोडशी येथील जगन्नाथ भोसले, संभाजी पाटील, सुरेश भोसले सावकार, बाजीराव अण्णा, अमृत पवार, महेंद्र कदम, दत्ता पाटील, धनाजी सावंत, सचिन तांबे, अशोक पवार, अवधूत पाटील, प्रमोद शिंदे, रवि लोंढे, दादासो कदम, संजय शिंदे, हनमंत शिंदे, अर्चना पाटील, विजय माने, राजेश पाटील, विठ्ठल शिंदे, नबी मुल्ला, इसमाईल सुतार, ग्रामविकास अधिकारी गिरीश गवळी, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे रोहिदास नगर परिसरातील रस्त्यांची सुविधा सुधारणार असून, वाहतूक व दैनंदिन हालचाली अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



