राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मलकापुरात जाहीर सभा

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार, दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता मलकापूर येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेस राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (आबा) हे प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील – उंडाळकर,
सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, कार्याध्यक्ष संजय देसाई, राजेश पाटील – वाठारकर, सुनील पाटील, अॅड. आनंदराव पाटील, इंद्रजीत चव्हाण,अजित पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजीराव काटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मलकापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्यन सविनय कांबळे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व अपक्ष या आघाडीचे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेला मलकापूर शहरातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे.



