जनतेची सेवा करण्यासाठी ईश्वराने ताकद द्यावी – आमदार मनोजदादा घोरपडे
चरेगाव येथे वर्षपूर्ती सत्कार सोहळा संपन्न

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या आमदारकीला एक वर्ष पूर्ण झाले व कराड उत्तर साठी 760 कोटीचा निधी मंजूर करून आणला यानिमित्त चरेगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व भव्य नागरी सत्काराचे आयोजन मा.सभापती पतंगराव माने, मा.पं. स.स. मोहनराव माने, यशस्वी उद्योजक विलासतात्या माने, सरपंच देवदत्त माने, आमदार मनोजदादा युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी रामकृष्ण वेताळ प्रदेश सचिव, बाळासाहेब चोरेकर, सुरेशतात्या पाटील,या मान्यवरांची उपस्थिती होती.
सुरुवातीला आमदार मनोजदादा घोरपडे यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये वर्षपूर्ती साठी भव्य नगरी सत्कार करण्यात आला या वेळेला अध्यात्माचे प्रतीक म्हणून विठ्ठल रखूमाईची मूर्ती देवून आमदार घोरपडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खालकरवाडीचे माजी सरपंच अमर माने व विद्यमान सरपंच हर्षेराव जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपा प्रवेश केला
यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले मी सर्वसामान्य जनतेचा आमदार आहे. सर्वसामान्य जनतेची कामे करताना मला मनस्वी आनंद होत असतो आणि ती कामे करण्यासाठी ईश्वराने मला ताकद द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आमदारकीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षांमध्ये कराड उत्तर मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. निवडणूक निवडून आल्यानंतर नागपूर येथील पहिल्या अधिवेशनामध्ये कराड उत्तर मधील प्रलंबित पाणी योजना उंब्रज उड्डाणपूल याचे प्रश्न मांडले आणि हे सर्व प्रश्न एका वर्षामध्ये सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्यास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यश आले. माझ्या परीने शक्य तेवढी जनतेची कामे करणे विकास करणे यासाठी प्राधान्य राहणार असून मी सर्व जनतेचा आमदार आहे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम कसे पूर्ण करता येईल यासाठी सतत प्रयत्न करत असतो. इथून पुढच्या काळामध्ये रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मानस आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांच्या कडून मतदार संघासाठी भरघोस निधी मिळत आहे. आज उंब्रज ते चोरे रस्त्यासाठी 20 कोटीचा नवीन निधी उपलब्ध झालेला आहे. यावेळी योगीराज सरकाळे मदन भाऊ काळभोर रणजीत पाटील जयवंत जगदाळे मीनाक्षीताई पोळ दौलतराव साळुंखे मानसिंगराव जाधव सुहास खांबे महेंद्र सूर्यवंशी आनंदराव माने राहुल माने ओंकार कुलकर्णी अमृत सूर्यवंशी निळकंठ देशमाने वनिता माने सागर माने नयन निकम ज्योतीराम माने बाजीराव माने बाळासो माने विक्रम माने अक्षय माने अमर माने प्रणित माने दीपक माने शंकर पवार शिंदे शहाजी मोहिते नथुराम पाटील भिकूंना जाधव महेश लोहार आबासाहेब पवार तानाजी पवार संदीप केंजळे आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक हिमांशू शहा यांनी तर आभार अनिल माने यांनी मानले.
काही लोकांन पासून सावध राहा -पतंगराव अण्णा माने
व्यासपीठावरून बोलताना पतंगरावअण्णा माने म्हणाले राजकारण हे ठराविक लोकांचे राजकारण आहे. असे लोक गाव व विभाग वार आहेत. तुम्ही जनतेचे आमदार आहात “आम” म्हणजे सामान्य या सामान्यांसाठी आपले दार कायमच उघडे असते तसेच आपण सामान्य लोकांची कामे जातीने लक्ष घालून करता अशीच सेवा कायमस्वरूपी ठेवा आणि हेच ह्या लोकांना पटत नाही त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा त्यांची दुकानदारी बंद पडण्याची वेळ आलेली आहे. असा प्रेमाचा सल्ला पतंगराव माने यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांना दिला.



